संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्तांचे निवडी जाहीर !

लोंढे कबीर महाराज, पाटील महाराज, ॲड. रोहिणी पवार नूतन विश्वस्त
आळंदी : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळातील ६ पैकी उर्वरित ३ विश्वस्त पदांचे निवडीसाठी ठराविक अर्जदारांच्या मुलाखती नंतर दोन आळंदीतील तर एक पुण्यातील असे तीन विश्वस्तांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकार चैतन्य महाराज कबीर बुवा लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर आणि पुण्यातून ॲड. रोहीणी पवार या एकमेव पहिल्या महिला विश्वस्त यांचा समावेश आहे. आळंदीतील कबीर मठाचे प्रमुख म्हणून कार्यरत चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे, अमृतनाथ स्वामी महाराज धमर्शाळेचे प्रमुख महंत पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर तसेच महीला विश्वस्त म्हणून पुण्यातील विधीतज्ञ रोहीणी पवार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त विश्वस्तांचा आळंदी जनहित फाउंडेशनच कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे सह विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, पदाधिकारी यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला.
