दोषीच्या जन्मठेपेवर मी समाधानी नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संताप
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
कोलकाता (वृत्तसंस्था) : येथील आर जी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉय याला आज (ता. २०) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. या निकालावर मी समाधानी नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
दोषी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली जाणे अपेक्षित होते. आम्ही सर्वांनीच फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. घटनेचे गांभीर्या पाहता सुरुवातीपासूनच आम्ही मृत्युदंडाची मागणी करीत होते. हे प्रकरण जर सीबीआयकडे सोपविले नसते, आणि राज्यसरकारच्या हाती असते र आम्ही कधीच त्याला फाशीची शिक्षा दिली असती. कोलकाता पोलिसांकडून हे प्रकरण जबरदस्तीने काढून घेण्यात आले. आमच्या हातात हे प्रकरण असते, तर आरोपीला आतापर्यंत कठोर शिक्षा दिली असती, असे ममता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.