फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी पिंपरी-चिंचवड

गणपती विसर्जनावेळी सांगवीमध्ये तिघांवर कोयत्याने हल्ला

गणपती विसर्जनावेळी सांगवीमध्ये तिघांवर कोयत्याने  हल्ला

सांगवी : सांगवी मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी पाहात असताना कोयत्याने तिघांवर वार केल्याची घटना घडली आहे. पूर्ववैमनस्त्यातून खून करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

या घटनेप्रकरणी रिद्धेश उर्फ लाला हेमंत पाटील आणि शुभम बाबुराव नावळे या दोघांना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटने प्रकरणी गालीब करीम शेख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तयारी वेळी ही घटना घडलेली आहे. फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ आकीब शेख, सिद्धांत धेंडे आणि गौरव भरत यलमार हे गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी बघण्यासाठी रस्त्यावर थांबले होते. तेव्हा, आरोपी सिद्धेश आणि शुभम यांच्यासह इतर काही जणांनी फिर्यादी गालिब यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वादात आकीब, सिद्धार्थ आणि गौरव हे पडल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात तिघे ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकीबच्या पाठीवर आणि कपाळावर वार करण्यात आले आहेत. सिद्धांतच्या गालावर आणि गौरव च्या पाठीत वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर सांगवी परिसरात एकच खळबळ उडाली होती. अवघ्या काही तासात आरोपींना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत.
गणपती विसर्जनावेळी सांगवीमध्ये तिघांवर कोयत्याने हल्ला

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"