फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
गुन्हेगारी

अट्टल घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी केली अटक!

अट्टल घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी केली अटक!

पिंपरी : 100 पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत . आरोपीकडून 25 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

जयंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवी दापोडी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे . सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, भोसरी दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .

सराईत गुन्हेगार जयंत गायकवाड याच्यावर तब्बल 44 गुन्हे दाखल असून इतर 53 गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत. सहा गुन्हे उघडकीस आले आहेत अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली . ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार , उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे , सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या पथकाने केली आहे

.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"