औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२व्या जलतरण स्पर्धात;”सँडविक एशिया” कंपनीला विजेतेपद!

जेड ग्लोबलने उपविजेतेपद ; १९ कंपन्यांच्या ११५ स्पर्धकांचा सहभाग
पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२व्या जलतरण स्पर्धात “सँडविक एशिया”ने विजेतेपद तर जेड ग्लोबलने उपविजेतेपद मिळविले. जलतरण स्पर्धा रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी कै.अण्णासाहेब मगर जलतरण तलाव नेहरूनगर येथे संपन्न झाली.या स्पर्धेचे आयोजन “सँडविक एशिया”यानी केले होते.

याप्रसंगी बोलताना सँडविक एशिया एम्प्लॉईज क्लब अध्यक्ष जितेंद्र भोर म्हणाले की यावर्षी स्पर्धकांचा प्रतिसाद बघून आम्हाला आनंद वाटतो आहे यावर्षी उत्तम उत्तम खेळाडूंचा खेळ पाहण्यास मिळाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सँडविक एशिया एम्प्लॉईज युनियनचे हृदय म्हात्रे,जितेंद्र भोर,गिरीश मुळुक,दुष्यंत गायकवाड,मंगेश मुठे,अभय तळदेवकर,योगेश देशपांडे, नरेंद्र कदम नितीन कदम प्रवीण तांबे(एचआर मॅनेजर,टाटा मोटर्स),अतुल काळोखे(एचआर मॅनेजर,बजाज ऑटो)यांनी केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुष्यंत गायकवाड, प्रास्ताविक वसंत ठोंबरे यांनी केले
या स्पर्धेचे उद्घाटन हृदय म्हात्रे – अध्यक्ष ( सँडविक एशिया एम्प्लॉइज युनियन),यांनी केले.याप्रसंगी ते म्हणाले की खेळ हा शरीर व मनाला सुदृढ बनवतो त्यामुळे प्रत्येकाने खेळ खेळायलाच हवा. जितेंद्र भोर – अध्यक्ष (सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लब),गिरीश मुळुक – उपाध्यक्ष (सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लब),दुष्यंत गायकवाड – सेक्रेटरी ( सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लब )मंगेश मुठे – खजिनदार (सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लब), सदस्य अभय तळदेवकर ,योगेश देशपांडे,सचिन लोहार,सँडविक एशिया एम्प्लॉइज युनियनचे सदस्य राजेश कुमार,सुनील डावरे, टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे नितीन कदम,प्रवीण तांबे(एचआर मॅनेजर,टाटा मोटर्स),अतुल काळोखे(एचआर मॅनेजर,बजाज ऑटो,तसेच औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम,हरी देशपांडे,विजय हिंगे,प्रदीप वाघ, दिनेश भुजबळ (महिंद्रा अँड महिंद्रा), सचिन कांबळे (जेसीबी),अमित कदम उपस्थित होते.
या स्पर्धेस टाटा मोटर्स,एसकेएफ,सँडविक एशिया,बजाज ऑटो आकुर्डी,टीकेआयएल,जेड ग्लोबल,महिंद्रा अँड महिंद्रा,जेसीबी,फॉरविया,कोफोर्ज, जेएसडब्ल्यू,सनशिल्ड केमिकल्स,टेट्रापॅक,प्रभा इंजीनियरिंग,इ वाय,एक्साइड,कमिंस,जीएसटी, थरमॅक्स वगैरे १९ कंपन्यांच्या ११५ स्पर्धकांनी भाग घेतला.स्पर्धा एकूण १० गटांमध्ये झाली.या स्पर्धेत महिलांचाही सहभाग होता.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दुष्यंत गायकवाड, मंगेश मुठे,अभय तळदेवकर,राम मासुळकर,पीडी पाटील ठाणेकर,हरी देशपांडे,विजय हिंगे,प्रदीप वाघ,अमित कदम यांनी सहकार्य केले.समारंभाच्या शेवटी प्रदीप वाघ यांनी आभारप्रदर्शन केले.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे ( पुरुष )
१) ५०मी,फ्रीस्टाइल,४०वर्षांखालील:१)गिरीश मुळूक-सँडविक एशिया(३०.३३से),२)शैलेश मुळूक-कोफोर्ज(३२ॱ१८से),३)सचिन शिंगरूट-सनशिल्ड केमिकल्स(३३.३५से)
२) ५०मी,बटरफ्लाय,४०वर्षांखालील:१)गिरीश मुळूक-सँडविक एशिया(३५.९८से),२)सचिन शिंगरूट-सनशिल्ड केमिकल्स(४१.९७ से),३)अमेय एंचवार-बजाज ऑटो,आकुर्डी(४८.४७ से).
३) ५०मी,बटरफ्लाय,४०वर्षांवरील:१)उदय खरसन-जेड ग्लोबल(३९.५२ से),२)रामचंद्र खत्री-बजाज ऑटो आकुर्डी(४४ॱ३९से),३)मुकुंद शेळके-टाटा मोटर्स(४८.७८ से)
४) ५०मी,ब्रेस्टस्ट्रोक,४०वर्षावरील:१)उदय खरसन-जेड ग्लोबल(४५.६४से),२)मुकुंद शेळके-टाटा मोटर्स(४७ॱ०९से),३)मोहिंदर तेलंग-एक्साईड (४९.६८से)
५) ५०मी,फ्रीस्टाइल,४०वर्षांवरील:१)उदय खरसन-जेड ग्लोबल(२९.३५से),२)रामचंद्र खत्री-बजाज ऑटो आकुर्डी(३५.१६से),३) एस आर बांदेकर- जीएसटी(३७.३९से)
६) ५०मी,बॅकस्ट्रोक,४०वर्षांवरील:१)उदय खरसन-जेड ग्लोबल(४२.०५से),२) मोहिंदर तेलंग-एक्साईड(४७.०४से),३) मुकुंद शेळके-टाटा मोटर्स (५५.४२से).
७) १००मी,फ्रीस्टाइल,४०वर्षाखालील:१)गिरीश मुळूक-सँडविक एशिया(१.१२मि),२) आर्यन जाधव-सँडविक एशिया-(१.१३मि),३)सचिन शिंगरूट-सनशिल्ड केमिकल्स(१.१६मि)
८) १००मी,ब्रेस्टस्ट्रोक,४०वर्षाखालील:१)श्रेयस अभ्यंकर-फॉरविया(१.३३मि),२)आर्यन जाधव-सँडविक एशिया(१ॱ४३मि),३) सचिन शिंगरूट- सनशिल्ड केमिकल्स(१.४७मि)
९) १००मी,बॅकस्ट्रोक,४०वर्षांखालील:१)आर्यन जाधव-सँडविक एशिया(१.२७मि),२)दिपेश पाटील-जेएसडब्ल्यू(१.५५मि),३)सचिन शिंगरूट-सनशिल्ड केमिकल्स-(१.५७मि)