पीएमआरडीए कार्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन!

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) आकुर्डी कार्यालयात गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसा, स्वच्छता व स्वावलंबन या विचारांचा तसेच शास्त्रीजींच्या “जय जवान, जय किसान” या घोषणेचे स्मरण करून देत कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्य आदर्श मानून प्रामाणिकपणे व समर्पण भावनेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कक्ष अधिकारी विशाल ताठे, जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले, वरिष्ठ लिपिक पांडुरंग मधुरकर, सुधाकर ठाकरे, हुसेन नदाफ आदी उपस्थित होते.

