सह्याद्री किंग्जचा शेट्टी बन्ट्सवर २२ धावांनी विजय!

सह्याद्री किंग्ज संघाचा सलग दुसऱा विजय ;सह्याद्री किंग्जनचा अभिषेक राय हा सामनावीर
पिंपरी, ता. ८ – पिंपरी – चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माण – हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित पर्व दोन ‘ टी – २० प्रीमियर लीग ‘ या क्रिकेट स्पर्धेच्या २० षटकांच्या ‘ टी – २० सामन्यात सह्याद्री किंग्ज संघाने सलग दोन विजय संपादन केले. कालच्या सत्रात (ता. ७) या संघाने विश्व टायगर्स या संघावर तर बुधवारच्या (ता. ८) सकाळच्या सत्रात शेट्टी बन्ट्स या संघावर २२ धावांनी विजय मिळविला. सह्याद्री किंग्जनचा अभिषेक राय हा सामनावीर मानकरी ठरला.

सह्याद्री किंग्जचा शेट्टी बन्ट्सवर २२ धावांनी विजय
सह्याद्री किंग्ज आणि शेट्टी बन्ट्स यांच्यातील धावफलक
सह्याद्री किंग्ज संघ – २० षटके ९ बाद १६२ धावा : सुशांत अभंग – ५४, पियुष पाटील ३६. अभिषेक राय – १४ धावा.
क्षितिज अगरवाल – ३ / ३०, रणवीर – ३ / १४ आणि आशिष आवले – ३ / १२.
शेट्टी बन्ट्स संघ – १९.१ षटके. सर्वबाद १४० धावा : श्रेयस जाधव – १८, मयूर गिड्डे – ३३, गगनदीप सिंग – २९ .
फरशे अन्सारी – २ / ३२ , अभिषेक राय – ३ / ५ . शेट्टी बन्ट्सच्या क्षितिज अगरवाल याला ‘ फायटर ऑफ द मॅच ‘ या किताबाने गौरविण्यात आले. तर या सामन्यात अभिषेक राय हा सामनावीर मानकरी ठरला.
मोरे पाटील पॅकर्सचा आसवानी डेअरडेव्हिलवर ४७ धावांनी विजय
मोरे पाटील पॅकर्स आणि आसवानी डेअरडेव्हिल यांच्यात हा सामना झाला. या सामन्यात मोरे पाटील पॅकर्सने ४७ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात आदित्य एकशिंगे हा सामनावीर ठरला तर आसवानी डेअरडेव्हिल्सच्या कुलदीप नायडू याला ‘ फायटर ऑफ द मॅच ‘ या किताबाने गौरविण्यात आले.
मोरे पाटील पॅकर्स संघ – २० षटके, सर्वबाद १४६ धावा : आदित्य एकशिंगे – ७१, फैय्याज लांडगे २४.
कुलदीप नायडू – ४ / २५ , ध्रुव मलिक – २ / १८
आसवानी डेअरडेव्हिल्स – १७.१ षटके, सर्वबाद ९९ धावा : रिश नाले – २२, गुंजन – १७ , ध्रुव मलिक – १८.
कार्तिक शेवाळे – ३ / १२ , फैयाज लांडगे – ३ / ९.

