रोटरी क्लब उद्योग नगरीकडून शालेय मुलींना 43 सायकलींचे वितरण!

पिंपरी : न्यू इंग्लिश स्कूल आंबोली ,(ता. जुन्नर) , येथील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्चील गाव,आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली या तीनही शाळांना रोटरी क्लब उद्योग नगरी पिंपरी व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब उद्योगनगरी पिंपरी चे अध्यक्ष प्रशांत शेजवळ हे होते.
आंबोली गावातील गरीब आदिवासी वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी व त्यांचा वेळ वाचेल आणि अभ्यास वाढवावा व तसेच शारीरिक व्यायाम व्हावा म्हणून सायकल वाटप करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबद्ल आणि करिअर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी उद्योगनगरी रोटरीचे सचिव वैभव गवळी व शिवनेरी रोटरी चे सचिव दत्तात्रेय म्हस्के युवा संचालक जयवंत अर्वट तसेच सर्व रोटरी सदस्य आणि आंबोली गावच्या उपसरपंच सविता कोकणे पेसा अध्यक्ष शांताराम भालचिम केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे, मुख्याध्यापक अन्वर सय्यद पूनम तांबे पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे ग्रामपंचायत सदस्य युवराज मोहरे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत भालचिम तसेच विद्यार्थी पालक ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले व आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ यांनी मानले