फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
पिंपरी-चिंचवड

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आर.एम.सी. प्लांट धारकांना अंमलबजावणी करण्याचे आदेश!

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आर.एम.सी. प्लांट धारकांना अंमलबजावणी करण्याचे आदेश!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत विविध उपाययोजना
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरातील आर.एम.सी. (Ready Mix Concrete) प्लांट, बांधकाम स्थळे तसेच बांधकाम साहित्य साठवणूक ठिकाणी धूळ व वायू प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार आर.एम.सी. प्लांट तसेच बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी या सूचनांचे पालन होत नसल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) मोजणी केंद्रांच्या नोंदीनुसार शहरातील हवेची गुणवत्ता सध्या मध्यम (AQI १०० ते १५०) या श्रेणीत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आर.एम.सी. प्लांट धारक, बांधकाम व्यावसायिक तसेच बांधकाम साहित्य पुरवठादार यांनी धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपामार्फत करण्यात आले आहे. संबंधित आस्थापनांची महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत नियमित तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत जोपर्यंत सदर उपाययोजना करण्यात येत नाही तोपर्यंत आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. गरज भासल्यास संबंधित आस्थापना सील करण्याची कारवाई देखील करण्यात येईल, असा इशाराही पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"