सेवानिवृत्तांनी त्यांच्या कार्यकाळात कामकाजावर निष्ठा व सेवेप्रती समर्पण : सह आयुक्त लोणकर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून अधिकारी,कर्मचारी असे एकूण ६१ जण सेवानिवृत्त
पिंपरी : महापालिका सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात त्यांना सोपविलेली कामे व कर्तव्ये जबाबदारीने व प्रामाणिकपणे पार पाडली असून सहका-यांशी सौजन्य व सहकार्याने अनेक वर्ष सेवा केली आहे.सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांची आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी आणि आनंदी जीवन जगावे तसेच आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा, असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले तसेच त्यांनी त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे माहे जून २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ५१ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १० अशा एकूण ६१ कर्मचाऱ्यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माचरे,महादेव बोत्रे, नथा माथेरे, मंगेश कलापुरे तसेच महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे मे २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये सहशहर अभियंता नितीन देशमुख, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, सहाय्यक आयुक्त नाना मोरे, मुख्याध्यापक वैशाली तवटे, हमीदा मोमीन, संभाजी बामणे, असिस्टंट मेट्रन किरण गायकवाड, कार्यालय अधिक्षक प्रमोद सावरकर, आनंदा सातपुते, ढवळू मुंढे, लेखापाल राजश्री नेवासकर, मुख्य लिपिक विजय जाधव, प्रमोद निकम, सिस्टर इन्चार्ज मिनहाज सय्यद, विजया रोडे, नंदा गायकवाड, उपशिक्षक श्रद्धा जोशी, अरूणा नलवडे, उज्ज्वला मरळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भिमराव चौधरी, वैजनाथ पांढरे, फिटर लक्ष्मण वायदंडे, वायरमन यशवंत जगताप, वायरलेस ऑपरेटर भगवान कांबळे, ऑपरेटर गोरखनाथ जराड, वॉर्ड बॉय सखाराम मोरे, रखवालदार अर्जुनन गणेशन, सुभाष साळुंके, पंढरीनाथ चौरे, शिपाई मोहन बहिरट, मजूर सुरेश बोडके, अशोक सातपुते, शिवाजी कुसाळकर, राजेंद्र ढोरे, पंढरीनाथ बारणे, मधुकर ठोंबरे, जयंत वाघेरे, दत्तात्रय मिसाळ, बाजीराव मासुळकर, मुकादम उत्तम गवळी, एकनाथ शेळकंदे, नाईक राजू बोरकर, सफाई कामगार राजकुमार जाधव, मंदा भुजबळ, सफाई सेवक विनोद सपकाळ, मेघनाथ सारसर, कचरा कुली अरूण लोंढे, गटरकुली मोहन मंजाळ, बाळू गायकवाड, भाऊसाहेब रोकडे, करिम शेख यांचा समावेश आहे.
तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई सेवक उत्तम त्रिभुवन, माया वाल्मिकी, संदिप लांडगे, शिरीष गायकवाड, कचरा कुली कैलास जगताप, अंबादास जाधव, गटरकुली मंजाळ शेट्टी, अनिल विटकर, वसंत चव्हाण, कचरा कुली बबन सांगळे यांचा समावेश आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
