कासारवाडीतील पुररेषा (ब्ल्यू लाईन) रद्दबातल करावी पालकमंत्री पवार यांना निवेदन!

पिंपरी : कासारवाडीतील पवना नदीच्या कडेला असणाऱ्या भागांमध्ये शासनाने पुररेषा आखली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..म्हणून पुररेषा (ब्ल्यू लाईन) रद्दबातल करावी याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांना कासारवाडी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

.त्याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णासाहेब बनसोडे, प्रकाशतात्या जवळकर सदस्य भा ज पा कार्यकारिणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, उद्योजक बाळासाहेब जवळकर , सतिशराव लांडगे, रविशेठ लांडगे माजी अध्यक्ष कासारवाडी उत्सव कमिटी,भा ज पा कार्यकर्ते .नानासाहेब डवरी,शिक्षण मंडळ माजी सभापती श्री.अभिमन्यु दहितुले आदी यावेळी उपस्थित होते.

