मोरवाडी चौकातील अनावश्यक डीव्हायडर हटवा; अन्यथा तीव्र आंदोलन!

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांची मागणी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोरवाडी चौक (अहिल्यादेवी पुतळ्यासमोर) येथे रस्त्याच्या मध्यभागी बसविलेल्या अनावश्यक व अशास्त्रीय काँक्रीट डिव्हायडरमुळे शहरवासीयांना होणारा त्रास, वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन वतीने मनपा प्रशासनावर अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

जर हा डिव्हायडर तात्काळ हटवला गेला नाही आणि मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी मनपा मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचा सणसणीत इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे. मनपाने कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता आणि वाहतूकधारक संघटनांशी चर्चा न करता हा डिव्हायडर बसवला आहे. अत्यंत महत्त्वाचा असलेला मोरवाडी चौक येथील रस्ता अकाराणे अरुंद झाला आहे. या मुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागत आहेत, ज्यामुळे नागरिकांचा अमूल्य वेळ वाया जात आहे.
🛑 संघटनेच्या प्रमुख मागण्या
महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनने मनपा आयुक्तांकडे खालील सात निर्णायक मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
उच्चस्तरीय चौकशी: डिव्हायडर बसविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची, संबंधित ठेकेदाराची आणि जबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करावी. तात्काळ डिव्हायडर हटवा: मोरवाडी चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी हा अनावश्यक डिव्हायडर तात्काळ हटविण्यात यावा.
- दोषींवर कठोर कारवाई: शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब न करता मनमानी निर्णय घेणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.
- तज्ज्ञ समिती: डिव्हायडरमुळे दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी वाहतूक तज्ज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन करावी.
- जनसहभाग बंधनकारक , अवैज्ञानिक प्रकल्प रद्द, संयुक्त नियोजन समिती
📢 आंदोलनाची पूर्वसूचना
वरील मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने व घेराव आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात रिक्षावर टॅक्सी चालक सहभागी होणार असून शहरातील नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत मुख्य संघटक शुभम तांदळे यांनी केले आहे,

