फक्त मुद्द्याचं!

8th September 2025
पिंपरी-चिंचवड

वस्तूंचा पुनर्वापर करा, गरजूंना आधार द्या!’ ; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उपक्रम

वस्तूंचा पुनर्वापर करा, गरजूंना आधार द्या!’ ; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उपक्रम

आर.आर.आर. सेंटरमध्ये वस्तू जमा करण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन
पिंपरी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरात रीड्यूस – रीयुज – रिसायकल (RRR) सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभागांत उभारण्यात आलेल्या या केंद्रांद्वारे नागरिकांकडून घरात पडून असलेल्या पण अजूनही वापरण्यायोग्य वस्तू संकलित करून त्या थेट गरजूंपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होत असून समाजातील गरजूंना उपयुक्त वस्तू उपलब्ध होत आहेत.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली सुरू असणाऱ्या महापालिकेच्या आर.आर.आर. सेंटरमध्ये संकलित साहित्याचे प्रथम वर्गीकरण केले जाते. त्यातील उपयुक्त वस्तू गरजूंना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, तर उर्वरित वस्तू रिसायकल प्रक्रियेद्वारे नव्याने उपयोगात आणल्या जातात. या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे. रिसायकल संस्कृतीमुळे संसाधनांचा अपव्यय थांबेल, गरजूंना आवश्यक साहित्य मिळेल तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता व पुनर्वापराची जाणीव निर्माण होऊन पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

viara vcc
viara vcc

आर.आर.आर. सेंटरवर नागरिक खालील प्रकारच्या वस्तू जमा करू शकतात
शैक्षणिक साहित्य : जुनी पण वापरण्यायोग्य पुस्तके, वह्या, शालेय साहित्य
कपडे : चांगल्या स्थितीतील कपडे, चादरी, पडदे
खेळणी व बालसाहित्य : मुलांची खेळणी, शैक्षणिक साधने
घरगुती व दैनंदिन वापराचे साहित्य : भांडी, फर्निचर, घरगुती वस्तू
इलेक्ट्रॉनिक व इतर साहित्य : छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला, इतर उपयुक्त साहित्य
पुनर्वापर करता येणाऱ्या विविध वस्तू, महापालिकेचे नागरिकांना आवाहन घरात तुम्ही वापरत नसलेल्या पण उपयुक्त असणाऱ्या वस्तू कचऱ्यात फेकून न देता जवळच्या आर.आर.आर. सेंटरवर जमा करा.

गरजूंना मदत करा – पर्यावरणाचे रक्षण करा.
शहरात रीड्यूस – रीयुज – रिसायकल संस्कृती रुजविण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवा.
आर.आर.आर. सेंटर ही काळाची गरज आहे. घरातील वापरण्यायोग्य वस्तू कचऱ्यात न टाकता त्या जर आपण या केंद्रावर आणून दिल्या, तर त्या इतर गरजूंना देता येतात. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

प्रभागनिहाय आर.आर.आर सेंटर
अ क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक १० कापसे उद्यान, मोरवाडी, प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी भाजी मंडई, प्रभाग क्रमांक १५, संत तुकाराम महाराज गार्डन, प्रभाग क्रमांक १९ श्रीधरनगर गार्डन
ब क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक १७ एसकेएफ कंपनी शेजारी थेरगाव, प्रभाग क्रमांक १८ हेगडेवार पूल दर्शननगरी, प्रभाग क्रमांक १६ धर्मराज चौक रावेत , प्रभाग क्रमांक २२ ज्योतिबा उद्यान काळेवाडी

क क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक ०९ हेगडेवार क्रीडा संकुल अजमेरा, पिंपरी प्रभाग क्रमांक ०६ धावडे वस्ती , भोसरी प्रभाग क्रमांक ०२ , संत शिरोमणी सावता महाराज उद्यान, मोशी ,प्रभाग क्रमांक ०८ संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल पिंपळे गुरव
ड क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक २९ प्रभाग कार्यालय २९ मध्ये, प्रभाग क्रमांक २८ लिनियर गार्डन कोकणे चौक पिंपळे सौदागर, प्रभाग क्रमांक २६ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान पिंपळे निलख, प्रभाग क्रमांक २५ तानाजी कलाटे उद्यान ,वाकड
इ क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक ०३ मोशी चौक, मोशी प्रभाग क्रमांक ०४ दिघी जकात नाका प्रभाग क्रमांक ०५ , ०७ राजमात जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी

फ क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक ०१ वृंदावन चिखली, चिखली कार्यालय , प्रभाग क्रमांक ११ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान , प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर पोलिस चौकी, रूपीनगर, प्रभाग क्रमांक १३ शनि मंदिर सेक्टर २१
ग क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक २३ थेरगाव हॉस्पिटल शेजारी, जगताप नगर, प्रभाग क्रमांक २४ सुखनगरी, बिजलीनगर आकुर्डी प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगाव बस स्टॉप, पिंपरीगाव, प्रभाग क्रमांक २७ आरोग्य कोठी रहाटणी गावठाण
ह क्षेत्रीय कार्यालय : प्रभाग क्रमांक २० छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक ३० सितांगण गार्डन, प्रभाग क्रमांक ३१ कै.काळुराम जगताप तलाव , प्रभाग क्रमांक ३२ जुनी सांगवी भाजी मंडई, जुनी सांगवी

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"