फक्त मुद्द्याचं!

25th March 2026
गुन्हेगारी

आर.डी कॉर्पोरेशन फर्मची 1 लाख 2749 रुपयांची फसवणूक!

आर.डी कॉर्पोरेशन फर्मची 1 लाख 2749 रुपयांची फसवणूक!

पिंपरी :आरडी कॉर्पोरेशन या फर्मचा जीएसटी भरण्यासाठी ऑनलाइन घेतलेली रक्कम न भरता आर्थिक फसवणूक केली अशी फिर्याद एक टॅक्स कन्सल्टंट आणि एका महिलेविरोधात देण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार 9 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

viara vcc
viara vcc

हा प्रकार जून 2023 ते 9 12 2025 पर्यंत सर्व्हे नंबर 17 ,मातृ-पितृ कृपा बिल्डिंग ,भोसरी या ठिकाणी घडला. मिलिंद विठ्ठलराव घाटे (वय 55 , रा विठ्ठल बिल्डिंग, अंगणवाडी रोड ,मोरे वस्ती, चिखली, मूळ पत्ता देगलूर, जिल्हा नांदेड) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश रावजी थोरात (वय 35 सर्वे नंबर 17 /1, मातृ-पितृ कृपा बिल्डिंग ,सोपान धावडे मार्ग, धावडे वस्ती भोसरी )यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी ऋषिकेश थोरात यांची आर.डी कार्पोरेशन ही फर्म आहे. या फर्मचा जीएसटी भरण्यासाठी ऑनलाईन 1 लाख 2749 इतकी रक्कम आरोपी मिलिंद घाटे आणि एका महिलेने घेतली .आरोपीने फर्मच्या खरेदी विक्री बिलामध्ये फेरफार करून जीएसटी पोर्टलला जीएसटी रक्कम भरली आहे असे दाखवले .परंतु त्यांनी ही रक्कम भरलीच नाही हे फिर्यादीच्या लक्षात आले . आरोपीने त्यांची फसवणूक केली असल्याचे उघड झाल्याने फिर्यादीने भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .भोसरी पोलीस याबाबत तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"