फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
अध्यात्म

१५० वर्षे जुन्या रथातून होणार आळंदीत माउलींचा रथोत्सव!

१५० वर्षे जुन्या रथातून होणार आळंदीत माउलींचा रथोत्सव!

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मोत्सव सप्त शतकोत्तर वर्ष (७५० वे वर्षे) सुरू असून त्यानिमित्ताने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन आळंदी देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. सप्त शतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून आळंदी देवस्थानने भाविकांसाठी अनोखी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी चांदीच्या रथातून होत असणारा हा रथोत्सव यंदा १५० वर्षे जुना लाकडी रथातून होणार आहे.

तब्बल २३ फूट उंच आणि अंदाजे १ हजार २०० किलो वजन असलेल्या या रथातून माउलींचा आळंदी शहरातून रथोत्सव पार पडणार आहे. सध्या देवस्थानकडून रथाची डागडुजी व रस्त्यावर चालण्याचा सराव सुरू आहे. यामुळे ज्या रथातून रथोत्सव सुरू करण्यात आला अशा मूळ लाकडी रथातून यंदाचा रथोत्सव पाहण्याचे साक्षीदार भाविक ठरणार आहेत. ही अनोखी पर्वणी असून, याचे स्वागत आळंदीसह राज्यभरातील भाविकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.

श्रीगुरू नरसिंह सरस्वतीस्वामी महाराज
इ.स. १८७३ मध्ये श्रीगुरू नरसिंह सरस्वतीस्वामी महाराज आळंदीला आले. इ.स.१८८६ ला त्यांनी आळंदीत समाधी घेतली. आपल्या ११ वर्षे आळंदीतील कार्यकाळात त्यांनी माऊलींच्या वैभवात भर टाकण्यात मोठे योगदान दिले. माउलींच्या कार्तिकी उत्सवात रथोत्सव त्यांनी सुरू केला. त्यासाठी सुरेख नक्षीकाम असलेला शिसम लाकडाचा भव्य रथ त्यांनी माऊलींसाठी बनविला. त्यातून पुढील काही दशके रथोत्सव या रथातून सुरू होता. मात्र, तत्कालीन रस्त्यांची अवस्था आणि रथाची भव्यता पाहता पुढे देवस्थानने हजेरी श्रीमारुती मंदिर चौकात भव्य रथ उभारणी मंडप बांधला व त्यात हा रथ अनेक वर्षे ठेवण्यात आला. आता हा रथ यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्यात रथोत्सवासाठी बाहेर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून याबाबतची तयारीही सुरू झाली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"