”नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन”

- कीर्तनकार रामायणाचार्य ढोक महाराज
भक्ती आणि शक्तीचे मूर्त रूप म्हणजेच भोसरीचे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे होत. राईचा डोंगर करता येते याबद्दल मला चांगलं माहित आहे. आमचे महेश दादा लांडगे म्हणजे संतश्रेष्ठ तुकोबारायांचे एक वचन आहे ‘नारळ वरुता कठीण अंतरी जीवन’ तुकोबाराय म्हणतात नारळ वरून कठीण असतो. पण, आतमध्ये त्याच्यात पाणी असते. तसं दादा पाहणाऱ्याला कठीण दिसतात. पण, त्यांचे अंतरंग लोण्यासारखे आहे, असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य ढोक महाराज यांनी व्यक्त केले.

आमदार महेश लांडगे यांचे वारकरी संप्रदायासाठी असणारे योगदान, संप्रदाय वाढीसाठी होणारे प्रयत्न याविषयी महाराजांनी महेश दादांचे अंतरंग उलगडले. त्यांच्यातील माणूस, नेता, कार्यकर्ता याविषयी भरभरून स्तुतीसुमने उधळली. महेश दादांशी स्नेह कसा वृद्धिंगत झाला, याबद्दलचे अनेक दाखले दिले. यातून महेशदादा लोकाभिमुख आहेत हे दिसून येते.
महेश दादांचे गुण सांगताना ढोक महाराज म्हणाले, ‘ महेश दादा माणूस म्हणून कसे आहेत. याविषयी अनेकांनी आपलं मत व्यक्त केला आहे. दादा पूर्वी कुस्त्या करायचे आणि नंतर ते वारकरी संप्रदायबद्दल त्यांचे खूप प्रेम कारण त्यांच्या वडिलांनी पंढरीची वारी केली आहे. विशेष म्हणजे दादाही आपल्या सोयीनुसार पंढरीला वारीला जात असतात. वारकऱ्यांबद्दल ज्यांना आदर आहे, अशा व्यक्तिमत्वापैकी एक आहेत. एकदा त्यांनी माझी देहू येथे राम कथा ऐकली होती. अगदी लांब बसून! याविषयीचा अनुभव महेश दादांनी मला सांगितला होता. दादा म्हणाले, ”एवढ्या उंच आवाजात एवढ्या खड्या स्वरांमध्ये साक्षात हनुमानजी बोलतात असं वाटलं. मला या महाराजांची मला भेट घ्यायची आहे.’ असे म्हणून ते मला भेटायला आले होते. खरे तर त्यांचा माझा हा पहिला आलेला संबंध स्नेह! ”
महेश दादाचं अंतर्मन लोण्यासारखं!
भोसरीतील रामकथेची आठवण सांगताना रामराव ढोक महाराज म्हणाले, ‘ देहूतील भेटीमध्ये त्यांनी मला भोसरीत रामकथा आयोजित करायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली. आणि मी त्यांना एका शब्दात होकार दिला. राम कथा काळात त्यांच्या कुटुंबात राहण्याचा योग आला. कुटुंबातील सर्व सदस्यांची जवळून ओळख झाली. त्यांच्या वडिलांशी खूप गप्पा झाल्या. राम कथा काळामध्ये एक दिवस वेळ होता. पंढरीला जायची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस त्यांनी त्यांचा एक ड्रायव्हर आणि गाडी मला दिली. त्यांचा ड्रायव्हर एक मुस्लिम कार्यकर्ता होता. एका दिवसात त्याने मला पंढरपूरचे दर्शन घडले. त्यावेळेस त्या व्यक्तीकडून दादांचे अंतकरण किती लोण्यासारखं मऊ आहे हे ऐकायला मिळाले.”
दादा आमदार झाले तरी पाय जमिनीवर!
महेश दादांमधील माणूसपण याबद्दलची आठवण सांगताना ढोक महाराज म्हणाले, ”पुढे आमचे दादा आमदार झाले. पण पाय मात्र, जमिनीवर होते आणि राहणार. याचे कारण त्यांना वारकरी सांप्रदायाचा अधिष्ठान आहे. माणूस कितीही मोठा झाला. तरी तो माणूसपण विसरत नाही, याचे कारण वारकरी सांप्रदायाच्या संस्कार. ”
त्यांच्या अंतकरणात विठ्ठला नंतर महेश दादांचा स्थान!
कोरोना काळात आलेल्या अनुभवाविषयी ढोक महाराज म्हणाले, ”कोरोनाचा कालखंड अत्यंत विपरीत होता. त्या काळात आलेले अनुभव आपण कधीही विसरू शकत नाही. या कालखंडात महामारी वाढत होती आणि दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध नव्हते. सामान्य रुग्णांना जागा मिळत नव्हती. या काळात दादांमधील आम्हाला माणूस पण दिसलं. तसं पाहिलं तर आम्ही वारकरी, आम्हाला कोण विचारतो. खर तर मोठ्या माणसांचे वशिले रुग्णालयांमध्ये असतात, असा आमचा समज. त्यावेळी अनेक कोरोना बाधित रुग्णांना वाटायचे की ढोक महाराजांचे राजकीय लोक ऐकतात. म्हणून ते मला फोन करत असत, मदतीची मागणी करत असत. त्यावेळी मी दादांना फोन करून वारकऱ्यांसाठी मदत मागत असे. त्या दोन वर्षाच्या कालखंडातील अनेक विषय आहेत त्यापैकी एक सांगावसं वाटतं.
आमच्या संस्थेतील एक शिक्षक माणिक शास्त्री हे करोना बाधित झाले होते. त्यावेळेस मी दादांच्या कानावर गोष्ट घातली. तर, रुग्णालयात जाईपर्यंत सगळी व्यवस्था झाली होती. हे एकच उदाहरण नव्हे तर मी जेवढी नावे त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्यांची काळजी घेतली. त्यांच्यावर चांगले उपचार होतात की नाही, हे पाहिले. खरे तर ते लोक जन्मभर पांडुरंगानंतर महेश दादांचे नाव घेतील. मला वाटतं दादांनी मदत केली त्यामुळेच अनेक लोकांचे जीवन वाचले. खरंतर माणसांची ओळख कधी असते. जो कठीण काळात जो आपल्याला मदत करतो. तसं पाहिलं तर चांगल्या काळात कोणीही येतं हार घालायला येत असतं. मात्र, कठीण काळात उपयोगी पडतात. ती माणसं नेहमी आठवणीत राहतात. म्हणूनच तुकोबारायांचं वचन त्यांच्या ठायी समर्पक ठरतं. नारळ वरूता कठीण, परी अंतरी जीवन. फणसा अंगी काटे परी अमृताचे साठे” असे हे व्यक्तिमत्व आहे. वरून ते कठोर वाटत असले तरी वारकरी संतांविषयी त्यांच्या अंतकरण लोण्यासारखे आहे. याचा आम्ही अनुभव घेतला यावरून आम्ही सांगू शकतो.
या व्यक्तिमत्त्वाविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. वारकरी संप्रदाय, धर्म संस्कृती याविषयी असणारी भक्ती आणि छत्रपती शिवरायांचे शौर्य, बाणा त्यांच्यामध्ये दिसून येतो. मला वाटतं खरं तर भक्ती शक्तीच हे रूपच आहेत. असं आम्हाला वाटतं. वारकऱ्यांसाठी अर्ध्या राती उभा असणारा आमदार हा आहे.
एका वाक्यात सांगायचं झालं ज्याचे कोणी नाही, त्याचा महेशदादा. गोरगरिबांसाठी सदैव उभे राहणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. आमचा बंधू, सखा आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आढावा घेणारे ग्रंथ प्रकाशित होत आहे, त्यासाठी महेश दादांना शुभेच्छा.
मैत्र जीवांचे: महेश दादा लांडगे : हभप पुरुषोत्तम पाटील महाराज
राजकारणापलीकडची मैत्री जपणारा, मित्रांसाठी धावून येणारा सच्चा मित्र असे वर्णन भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे करता येईल. ”आपुलिया हिता असे जो जागता, धन्य तयाचे माता पिता” हे वचन दादांठायी सार्थ ठरते.
वारकरी संप्रदायातील महेश दादांच्या योगदानाविषयी पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी जीवनात आलेले अनुभव आणि किस्से सांगितले.
मैत्रीचा अनुबंध उघडताना पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, ‘ महेशदादा लांडगे हे जरी आज आमदार असले तरी त्यांची आणि माझी मैत्री ही पंधरा ते वीस वर्षांपासून आहे. केवळ मैत्री नव्हे तर कौटुंबिक स्नेह आहे. महेश दादांनी वारकरी संप्रदायासाठी अनमोल असे योगदान दिलेला आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. भोसरी मध्ये शिवरात्रीनिमित्त दरवर्षी महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने शिवरात्री कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते या आयोजनाच्या सहभागामध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं होतं आणि आम्ही राज्यातील मोठमोठ्या कीर्तनकारांना आमंत्रित करून त्यांची कीर्तन सेवा घडवून आणली होती. मग त्यामध्ये हभप बाबा महाराज सातारकर, ढोक महाराज चैतन्य महाराज अशा अनेक महाराजांची किर्तन सेवा या महोत्सवात झालेली आहे. त्याचबरोबर मध्यंतरीच्या कालखंडामधें आयोध्येत राम मंदिराची निर्मिती होत असताना या मंदिराच्या निर्मितीसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महेश दादांनी योगदान दिले. परिसरामध्ये अनेक ठिकाणी मंदिरे उभारण्यासाठी दादांनी मदतीचा हात दिला आहे. त्यातून वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ”
देहू आळंदीच्या विकासासाठी सदैव कार्यरत!
धार्मिक कार्याला मदत करणं हा महेश दादांचा गुण भावना आहे असे सांगून पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, देहू आळंदी हे क्षेत्र मतदार संघात नसली तरी केवळ वारकरी संप्रदायाच्या प्रेमाखातर महेश दादांनी या दोन तीर्थक्षेत्रांसाठी निधी उपलब्ध करून देणे व तेथील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आळंदी मधील जोग महाराज संस्थेच्या जागेच्या आरक्षणाचा एक प्रश्न होता. तो प्रश्न महेश दादांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला. शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करणे त्याचबरोबर नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी आवाज उठवला होता. त्याचा परिपाक म्हणजेच नदी सुधार प्रकल्पाला गती मिळाली आहे राज्य शासनाकडून पर्यावरण विभागाची एनओसी मिळालेली आहे. दादांचे आणखी एक काम महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथे संत तुकाराम महाराज संत पिठाची निर्मिती केली आहे या संत पिठाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे शिक्षण परंपरा याचे दर्शन आणि शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. या संस्थेत मोठ्या प्रमाणावर मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत. ”
मैत्री जपणारा आणि मैत्रीसाठी जागणारा नेता!
राजकारण असो की समाजकारण, कला क्रीडा क्षेत्र, धर्मकारण असो की अध्यात्म अशा सर्व विभागांमध्ये सदोदित कार्यतत्पर राहणं, हा महेश दादांचा गुण भावनारा आहे, असे सांगून पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी महेशदादा लांडगे यांच्या यशाचे आणि लोकप्रियतेचे गमक सांगितलं.
पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, ”तरुणांमध्ये महेश दादा लांडगे यांची क्रेज आहे. सोशल मीडियावरही ते नेहमी सजग असतात. सदैव कार्य तत्पर असणं हा त्यांचा गुण सर्वांना भावना आहे. मैत्री जपणारा आणि मित्रांसाठी मदतीला जाऊन जाणारा हा आमचा मित्र आहे. मतदार संघातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे, जो येईल त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे, प्रश्न सुटेपर्यंत त्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे हा महेश दादांचा गुण मला भावतो त्याचबरोबर लोकांशी असणारा कनेक्ट, संपर्क हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
राजकारणात पद प्रतिष्ठा मिळाल्यानंतर अनेकांची सर्वसामान्यांशी असणारी नाळ तुटते. मात्र, महेश दादांच्या बाबतीत याउलट आहे, आमदार झाल्यानंतर त्यांची नाव मतदारांशी लोकांशी अधिक घट्ट झाली आहे. या निमित्ताने मला एक किस्सा सांगावासा वाटतो. माझ्या एका मित्राच्या दुकानाचे उद्घाटन आळंदी येथे होतं खरे तर आळंदी हा दादांच्या कार्यक्षेत्रातील भाग नाही, मात्र केवळ माझ्या मैत्री खातर त्या कार्यक्रमाला आले. वारकरी संप्रदायातील जे अनेक छोटे-मोठे प्रश्न असतात. ते प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्याकडे जात असतो, आणि ते मनापासून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘मैत्र जिवांचे, या नुसार मैत्री जपणारा हा आमचा मित्र आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घायुष्य मिळो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.