फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

चिंचवडमधून राहुल कलाटे आणि भोसरीतून अजित गव्हाणेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी

चिंचवडमधून राहुल कलाटे आणि भोसरीतून अजित गव्हाणेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी

पिंपरी : महाविकास आघाडीतून चिंचवड मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांची तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले नाना काटे यांच्यात उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप विरुद्ध शरद पवार गटाचे राहुल कलाटे असा सामना रंगणार आहे.

भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध शरद पवार गटाचे अजित गव्हाणे अशी चुरस होणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे रवी लांडगे, सुलभा उबाळे आणि अजित गव्हाणे यांचं नाव स्पर्धेत होतं. अखेर तिसऱ्या यादीत चिंचवड मधून राहुल कलाटे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध ठाकरे गटाचे अजित गव्हाणे असा सामना रंगणार आहे.

चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून चर्चा सुरू होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात चुरस होती. मात्र मतदारसंघात विजयी उमेदवार कोण होऊ शकतं यावर निवड मंडळाची चर्चा झाली यात राहुल कलाटे यांनी बाजी मारली. खासदार अमोल कोल्हे यांच्या मध्यस्थीने कलाटे यांना उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता राहुल कलाटे आणि शंकर जगताप याच्यात चुरशीची लढाई होणार अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे. राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कलाटे समर्थकांनी फटाके उडवून आनंद व्यक्त केला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"