पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अटकेत!

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा
अहिल्यानगर: नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला अटक केली आहे .रुपेश सूर्यकांत भन्साळी व 49 स्वारगेट पुणे असे त्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे .ही अटक पुण्यातील बांधकाम व्यवसायिक शैलेश अग्रवाल यांच्यासह इतर आठ जणांनी बँकेतून घेतलेल्या दहा कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाशी संबंधित आहे .
कर्जाची परतफेड न करता त्याचा गैरवापर केल्याचे बँकेच्या समोर आले .अगरवाल व त्यांच्या भागीदारींचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू होता. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुण्यात धाड टाकून वन्साळी यांना ताब्यात घेतले .प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील कर्ज घोटाळा गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गाजत आहे .यापूर्वी अनेक संचालक कर्जदारांना अटक करण्यात आली आहे.

सुमारे 291 कोटी रुपयांचे कर्ज विविध प्रकारे मंजूर करून त्याचा गैरवापर केल्याचा ठपका संबंधितावर ठेवण्यात आला आहे .या प्रकरणात आणखीही अनेकांची चौकशी सुरू असून इतर संशयीत आरोपींचा शोध शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे. भन्साळीच्या अटकेनंतर इतर भागीदारांचा शोध घेतला जात आहे.