फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

पिंपळे निलख येथे “स्पा”च्या नावाखाली वेश्याव्यवसाय ;स्पा मॅनेजरला अटक

पिंपळे निलख येथे “स्पा”च्या नावाखाली वेश्याव्यवसाय ;स्पा मॅनेजरला अटक

चार महिलांची सुटका
पिंपरी : रहिवासी हॉटेल व मसाज पार्लरच्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई करून स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई इंटरनल फॅमिली स्पा सर्वे नंबर 28/ 4 / बी वाकड- हिंजवडी रोड ,विशाल नगर, पिंपळे निलख येथे सोमवार दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी स्पा चालक महिला ,स्पा मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय 32, रा. इंटरनल फॅमिली स्पा, वाकड- हिंजवडी रोड, विशाल नगर, मूळ रा.डबोका रोड, न्यू जामा मस्जिद जवळ, ता. जमुना मुखजी, लंकानागाव, आसाम) यांच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली शेंडगे व पथकाने कारवाई केली.

सन 2025 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण 28 आस्थापनांवर छापे टाकून पिटा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण आठ मसाज पार्लर, सात हॉटेल, तीन रहिवासी फ्लॅट व दहा ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारा व्यवसायचा समावेश आहे. या 28 गुन्ह्यांमध्ये एकूण 45 आरोपींना अटक करून 63 पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे.

जानेवारी 2026 मध्ये सार्वजनिक ठिकाणांचे परिसरात मसाज पार्लर व रहिवासी ठिकाणाचे आडून अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण तीन आस्थापनांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्यात आले .त्यात चिंचवड परिसरातील निक्की लॉज ,काळेवाडी परिसरातील लेमन ग्रास थाई स्पा, सांगवी परिसरातील औरा थाई स्पा यांचा समावेश आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस फौजदार सुनील शिरसाठ ,पोलीस हवालदार भगवंता मुठे, गणेश कारोटे, श्रद्धा भरगुडे ,वैष्णवी गावडे, नीलम बुचडे या पथकाचा समावेश आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"