भोसरीसाठी खर्च निरीक्षक प्रेमप्रकाश मीना

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयास त्यांनी आज भेट दिली.
प्रेमप्रकाश मीना यांनी भोसरी विधानसभा मतदार संघाच्या पूर्णनगर येथील कार्यालयास मंगळवारी भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी त्यांना निवडणूक विषयक तयारीची सर्व माहिती दिली. निवडणूक खर्चाबाबत मतदार संघातील काही तक्रारी असल्यास ०२०-२७६५०९०१ या हेल्प डेस्कवर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे, निवडणूक खर्च व्यवस्थापन सहायक नोोडल अधिकारी मलप्पा वाघमारे, निवडणूक खर्च कक्ष समन्वय अधिकारी वैजनाथ आव्हाड, मनोज हिंगे, श्री. कांबळे आणि अन्य कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.