फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी प्रकाश जवळकर!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी प्रकाश जवळकर!

शिवाजी तापकीर यांची अध्यक्षपदी  बिनविरोध निवड
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच .वृंदा हॅाटेल मॅगझिन चौक आळंदी रोड येथे संपन्न झाली. या सभेत सन २०२५ते२०३० या कालावधीसाठी संघटनेच्या कार्यकारीणीची सर्वसंमतीने बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्रशासन अधिकारी सोपानराव लांडगे होते.. प्रकाश लक्ष्मण जवळकर कार्याध्यक्षपदी तर शिवाजी विठ्ठल तापकीर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिका सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असोशिएशन ची विश्र्वस्तसर्वसाधारण सभा दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता हाटेल वृंदा सभागृह मगेझीन चौक भोसरी येथे पार पडली. यामध्ये संघटनेची कार्यकारीणीची सर्वसंमतीने सन २०२५ते२०३० या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सचिव .डी.डी.फुगे यांनी अहवाल वाचन केले.आवाजी मतदानाने अहवालास मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिका सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असोशिएशन ची कार्यकारीणी पुढीतप्रमाणे
.शिवाजी तापकीर अध्यक्ष .प्रकाश जवळकर कार्याध्यक्ष , आनंदा कापसे -उपाध्यक्ष .दत्तात्रेय फुगे सरचिटणीस . रमण शर्मा खजिनदार , शहाजी माळी विश्र्वस्त . रामभाऊ सावंत विश्र्वस्त , .गणेश  विपट विश्र्वस्त , संजय .देसाई विश्र्वस्त , व्दारका टिळेकर विश्र्वस्त, श्रीमती मंगला नायडू विश्र्वस्त , घनशाम लुकर विश्र्वस्त, छबु शंकर लाडंगे स्विकृत विश्र्वस्त , निवृत्ती आरवडे स्विकृत विश्र्वस्त , नारायण अनभुले -स्विकृत विश्र्वस्त , सुरेश .भिडे -सल्लागार विश्र्वस्त , .विरेंद्र एकल सल्लागार विश्र्वस्त, राजू बेद -सल्लागार , औंदुबंर तुपे -सल्लागार विश्र्वस्त-

व्यासपीठावर अध्यक्ष .सोपानराव लांडगे, शिवाजीराव तापकीर,कार्याध्यक्ष , प्रकाशतात्या जवळकर,उपाध्यक्ष , आनंदराव कापसे,सचिव , डी.डी.फुगे उपस्थित होते.गणेश विपट यांनी आभार मानले.उपस्थितांमध्ये रामभाऊ सावंत ,भिडेसाहेब, छबुराव लांडगे ,नारायण फुगे ,म्हस्के,इत्यादी मान्यवर सभासद उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"