पिंपरी विधानसभा : दुसऱ्या दिवशी २५ जणांनी ४८ नामनिर्देशन पत्र घेतले

पिंपरी : २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज बुधवार दिनांक २३/१०/२०२४ रोजी दुस-या दिवशी एकुण २५ इच्चुकांनी निगडी येथील २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण ४८ नामनिर्देशन अर्जांची खरेदी केली आहे. दोन दिवसात 107 नामनिर्देशन अर्जांची खरेदी झाली आहे.
नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे
किसन शंकर कांबळे (महाराष्ट्र नवनिर्मान सेना), गजानन महादु इचके, जितेंद्र बाबासाहेब ननावरे, अतुल गणेश समर्थ, गौतम लक्ष्मणराव आरकडे, चेतन रमेश राठोड, तेजस्वीनी चंद्रकांत कदम, बाबसाहेब विश्वनाथ बनसोडे (भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस), विश्वानाथ बबनराव जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शाम अभिमन्यु घोडके, जफर खुर्शीद चौधरी (खाटीक) (स्वराज्य शक्ती सेना पार्टी), प्रल्हाद रामभाऊ कांबळे, नितीन अंकुश गवळी (वंचित बहुजन आघाडी), वैशाली कर्ण थोरात (बहुजन भारत पार्टी), शेखर पांडुरंग चंदनशिवे (राष्ट्रवादी कॉग्रेस, शरदचंद्रजी पवार), हेमंत अर्जुन मोरे, विजय हनुमंत रंदिल, राजेंद्र भिमराव साळवे (वंचित बहुजन आघाडी), अनिल गुलाबराव रणनवरे (बहुजन समाज पार्टी), विश्वास भगवान गजरमल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), बाबासाहेब किसन कांबळे, सुधीर लक्ष्मण जगताप (युनायटेड रिपब्लीक पार्टी), राहुल मल्हारी सोनवणे (वंचित बहुजन आघाडी), विशाल (साकी) संजय गायकवाड (राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार), अँड. सचिन सुरेश भोसले (शिवसेना उ.बा.ठा.) असे एकुण ४८ नामनिर्देशन अर्ज नेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. तसेच नामनिर्देशन स्विकृती अर्ज निरंक आहेत.