पिंपरी चिंचवड प्रीमियर टी-ट्वेंटी लीग स्पर्धेचे आयोजन !

पिंपरी : पिंपरी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन तर्फे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड प्रीमियर टी-ट्वेंटी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या खेळाडूंना व शहरात पाच वर्ष स्थायिक असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. शहरातील तरुण नवोदित खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शहरात प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

प्रीमियर लीग स्पर्धा प्रथम दोन गटांमध्ये लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे ,या स्पर्धा करिता खेळाडूंचा लिलाव एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. स्पर्धेकरिता एक लाखाचे प्रथम व चषक ,दुसरे पारितोषिक 75000 आणि चषक, तिसरे पारितोषिक 50000 आणि चषक अशी असेल. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व अष्टपैलू खेळाडू असेही वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे .खेळाडूंना नोंदणी करण्यासाठी असोसिएशनने एक लिंक तयार केली आहे. (https://konfub.com/Pimpri -Chinchwad-premier-league) सदर लिंक 8 एप्रिल 2025 पर्यंत खुली राहणार आहे, असे असोसिएशनचे सचिव राजू को,तवाल यांनी यांनी सांगितले.
स्पर्धेकरिता आठ संघमालक असून या संघाकरिता राजकीय औद्योगिक उद्योजक बांधकाम व्यवसायिक व क्लब चालक यांनी संघ विकत घेणे कामी असोसिएशनशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी केले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संजय शिंदे 98 59 झिरो 91 49 नरेंद्र कदम 98 223 70 688 यांच्याशी संपर्क साधावाआवाहन असे शेट्टी यांनी केले आहे.