पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग टी 20 क्रिकेट स्पर्धा; असवानी डेअरडेविल्स संघ विजयी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन यांचे मार्फत आयोजित करणेत आलेल्या PCPL टी20 क्रिकेट स्पर्धेत असवानी डेअरडेविल्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून विजेतेपद मिळविले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते पार पडला. सदरचा सामना फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी येथे झाला.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले की पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला असून भविष्यात या शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू तयार होतील व पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करून स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष रोहिदास कोंडे , अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल , उपसचिव डॉ. दिलीपसिंह मोहिते, उद्योजक श्रीचंद आसवानी, विजय आसवानी, माणिकचंद ऑक्सरीचने राजेश पवार उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक – छत्रपती संभाजी किंग्ज २० षटकात ५ बाद १४५ धावा – साईश शिंदे (५६ धावा) , विशाल गव्हाणे (४५ धावा), अथर्व भोसले (१३ धावा) , शहाबाज सय्यद (१/११) गणेश कलेल (१/१९) पराभूत विरूद्ध
आसवानी डेरेडेविल्स १९.२ षटकात ६ बाद १४९ धावा गणेश अंकुशे (५९ नाबाद*) रुद्र पटेल (२४ धावा), मनोज राऊत (१९ धावा) करण जाधव (३/२९) , साईश शिंदे (१/१६) , अक्षय डावखरे (१/२९)
अंतिम सामन्याचा मॅन ऑफ दि मॅच – गणेश अंकुशे
सर्वोत्कृष्ट फलंदाज – हर्षल हाडके – विश्वा टायगर्स
सर्वोत्कृष्ट गोलंदाज – जीत भारती – बारणे स्पोर्ट्स अकॅडमी
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक – आदित्य एकशिंगे – विश्वा टायगर्स
अष्टपैलू खेळाडू – साईश शिंदे – छत्रपती संभाजी किंग्ज