फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नूतनीकरण केलेल्या वेबसाईटचे लोकार्पण!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नूतनीकरण केलेल्या वेबसाईटचे लोकार्पण!

पिंपरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसीय कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त प्रशासकीय सेवा वेळेत उपलब्ध व्हावी ,यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नव्याने नूतनीकरण केलेल्या (https://pcpc.gov.in) या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण बुधवार 16 एप्रिल रोजी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले .राज्य सरकारने सुरू केलेल्या 100 दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत पोलीस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामगिरीचा आढावा प्रगती व माहिती नागरिकांना या स्वतंत्र टॅब द्वारे मिळणार आहे.

फीडबॅक फॉर्म कोणत्याही नागरिकांना पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत आपले अनुभव शेअर करता यावेत म्हणून नव्याने फीडबॅक फॉर्म तयार करण्यात आले आहेत .त्यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये पोलीस कर्मचारी कमी पडतात का, आणि त्यांच्या वर्तनाबाबतची माहिती आणखी बळकट होईल. भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये नोंदवणे आता सोपे झाले आहे .नव्या टॅबमुळे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना ही माहिती भरता येईल. यामुळे गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यास पोलिसांना मदत होणार आहे .पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वा वेबसाईटवरून सहज जोडले गेले आहेत .नागरिक आता सोशल मीडिया वरून पोलिसांशी संवाद साधू शकतात, तक्रारी सूचना माहिती मिळवू शकतात, विभागातील पोलीस स्टेशनला पोलीस उपायुक्त भेटींची माहिती मिळावी तसेच पोलीस स्टेशन मधील कामकाजात पारदर्शकता यावी व नागरिकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीची माहिती व्हावी म्हणून या टॅबची निर्मिती करण्यात आली आहे .या टॅब निर्मितीमुळे पोलीस लोकांच्या अधिक जवळ जाणे आणि सेवा अधिक प्रभावित करणे या नव्या वेबसाईटचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांनी करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.

viara ad
viara ad

यावेळी अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, परिमंडळ एक पोलीस उपायुक्त बापू बांगर, वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार ,परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे गुन्हे यावेळी उपस्थित होते. नव्याने तयार करण्यात आलेल्या वेबसाईट मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन ची माहिती लोकेशन व पोलीस स्टेशनचे फोटो तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मोबाईल नंबर सह अपलोड केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"