फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोहननगर मनपा शाळेला आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोहननगर मनपा शाळेला आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोहननगर येथील श्रीमती लीलाबाई कांतीलाल खिवंसरा प्राथमिक शाळा (मुले) या मनपा शाळेला राज्य शासनाने निश्चित केलेल्या २४ निकषांची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. गुणवत्ता वाढविण्याच्या दिशेने ही एक महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी या शाळेने केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होताना दिसत असून नुकतेच मोहननगर येथील शाळेला तर आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.

महापालिकेच्या मोहननगर येथील शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. सध्या शाळेत १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजिया खान, पर्यवेक्षक प्रमिला जाधव, जयमाला गावडे, मुख्याध्यापिका आशा निचळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ पत्रे यांच्या अधिपत्याखाली शाळेमध्ये आयएसओ मानांकनासाठी शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार विविध उपक्रम राबवण्यात आले.

यामध्ये शाळेतील बोलक्या भिंती, गांडूळ खत प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, भौतिक सुविधा, गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांची उपस्थिती, सौरऊर्जा प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, संगणक लॅब, डिजिटल वर्गखोल्या, प्रयोगशाळा, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांचे लेखन-वाचन कौशल्य आदींचा समावेश होता. आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी या सर्व बाबींची तपासणी करण्यात आली. यासोबतच मागील तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, पटसंख्या, शाळेचे शैक्षणिक व प्रशासकीय रेकॉर्ड, फाइल व्यवस्थापन आदींचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. त्यानंतर या शाळेला आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"