फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

भक्ती शक्ती येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव जनजागृती उपक्रम!

भक्ती शक्ती येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव जनजागृती उपक्रम!

पिंपरी : भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला.

viara vcc
viara vcc

स्वीप कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध भागात मतदान जनजागृती साठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने भक्ती शक्ती चौक येथे मतदान जनजागृतीसाठी एक अनोखा व प्रभावी उपक्रम राबविण्यात आला.

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनवरील टॉर्चच्या प्रकाशाच्या सहाय्याने एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारत मतदानाचा संदेश दिला. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या प्रतिकात्मक उपक्रमातून “मतदानानेच लोकशाही उजळते” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. मतदान हा प्रत्येक पात्र नागरिकाचा मूलभूत हक्क असून, तो निर्भयपणे व जबाबदारीने बजावणे आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला. विशेषतः युवक व प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये या उपक्रमामुळे उत्साह दिसून आला. यावेळी फ्लॅश मॉब चे सादरीकरण देखील करण्यात आले.

तसेच लोकशाही सशक्त करण्यासाठी प्रत्येकाचे मतदान आवश्यक आहे, या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"