पिंपरी चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीसाठी पाच लाख वाढले मतदार!

92 हजार 664 दुबार मतदार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतील मतदारांपेक्षा सुमारे पाच लाखांची मतदार संख्या वाढली आहे. 2017 मध्ये 11 लाख 92 हजार 89 मतदार होते .ते आता 17 लाख 13 हजार 891 मतदार झाले आहेत .

पिंपरी चिंचवड शहरात चार विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. एक जुलै 2025 पर्यंतची मतदार संख्या गृहीत धरण्यात आली असून त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. चिंचवड मतदार संघात सर्वाधिक सहा लाख 76 हजार 638 मतदार आहेत .त्या खालोखाल भोसरी सहा लाख 24 हजार 152, पिंपरी 3 लाख 19 हजार 811 आणि भोर मतदार संघ (ताथवडे गाव तेरा हजार दोनशे नव्वद )अशी मतदार संख्या आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागात 17 लाख 13 हजार 891 मतदार असून त्यामध्ये नऊ लाख चार हजार 815 पुरुष , 8 लाख 7 हजार 139 महिला आणि 197 इतर मतदार आहेत .प्रभाग क्रमांक एक चिखली मध्ये सर्वाधिक 74 हजार 344 आणि त्या खालोखाल चर्होली- डुडुळगाव मध्ये ७२ हजार ४१६, प्रभाग क्रमांक 16 रावेत- किवळे मध्ये ७२ हजार 227 मतदार आहेत .प्रभाग क्रमांक 23 थेरगाव गावठाण -पडवळ नगर मध्ये सर्वात कमी 34 हजार 766 मतदार आहेत
.प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचनांचा निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम यादी पाच डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादी मध्ये 92 हजार 664 दुबार मतदार आढळल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक एक ते32 दुबार मतदारांची निवडणूक विभागामार्फत प्रत्यक्ष स्थळ पाणी केली जाणार आहे. दुबार मतदारांकडून कोणत्या प्रभागात मतदान करणार याबाबतचा अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यानंतर अंतिम यादीत अशा मतदारांच्या नावापुढे दोन स्टार दिले जाणार आहेत अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

