पिंपरी चिंचवड महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची बदली!

नगररचना विभागाचे उपसंचालक पदी किशोर विष्णू गोखले यांची नियुक्ती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची बदली झाली आहे .छत्रपती संभाजी नगर येथील वाहतूक व परिवहन च्या नगररचना विभागाच्या उपसंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या नगर विकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी सोमवार दिनांक 7 रोजी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची दोन वर्षांपूर्वी नियुक्ती झाली होती. गायकवाड यांच्या कालखंडात महापालिकेचा विकास आराखडा महापालिकेत सादर करण्यात आला. त्यांच्या विरोधात महापालिका भवनासमोर विविध आंदोलने करण्यात आली .नगर विकास विभागातील पाच उपसंचालकांच्या बदल्या झाल्या. त्यात गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे.
गायकवाड यांची छत्रपती संभाजी नगर येथील वाहतूक व परिवहन विभागातील नगररचना विभागातील उपसंचालक पदी बदली झाली आहे त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्याच्या नागरी संशोधन घटक विभागातील संचालक किशोर विष्णू गोखले यांची नियुक्ती झाली आहे