फक्त मुद्द्याचं!

3rd April 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचा पाणीकर वसुलीत ८० कोटी ७४ लाखांचा विक्रम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा पाणीकर वसुलीत ८० कोटी ७४ लाखांचा विक्रम!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ मध्ये पाणीकर वसुलीत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला आहे. एकूण ८० कोटी ७४ लाख ९ हजार ८१० इतकी पाणीकर वसुली करण्यात आली असून, मागील सर्व वर्षांच्या तुलनेत हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ठरला आहे क्षेत्रनिहाय वसुलीमध्येही उल्लेखनीय कामगिरी झाली असून, सांगवी क्षेत्राने ७ कोटी ६५ लाख ७२ हजार २४३ इतकी सर्वाधिक वसुली करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

viara vcc
viara vcc

आढावा बैठका, थकीत मिळकतधारकांवर नियमानुसार कारवाई, डिजिटल नोटिसा तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पारदर्शक व सुलभ कार्यपद्धतीमुळे वसुली प्रक्रियेला गती मिळाली आणि महसुलात विक्रमी वाढ साध्य झाली.

या वाढीव महसुलातून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकासकामांना गती देण्यात येणार आहे. नवीन जलवाहिन्यांची उभारणी, गळती शोध व नियंत्रण यंत्रणा मजबूत करणे, जलशुद्धीकरण प्रकल्पांचे आधुनिकीकरण तसेच वितरण यंत्रणेची क्षमता वाढविणे यांसारख्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने सर्व करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत असून, उर्वरित थकीत पाणीकर तात्काळ भरून शहराच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या सहा वर्षात पाणीकर वसुलीत होतेय सातत्याने वाढ
आर्थिक वर्ष २०२०-२१ : ४१ कोटी ८४ लाख
आर्थिक वर्ष २०२१-२२ : ५४ कोटी ९८ लाख
आर्थिक वर्ष २०२२-२३ : ५७ कोटी ६१ लाख
आर्थिक वर्ष २०२३-२४ : ७८ कोटी ५६ लाख
आर्थिक वर्ष २०२४-२५ : ७६ कोटी ३२ लाख
आर्थिक वर्ष २०२५-२६ : ८० कोटी ७४ लाख

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"