पिंपरी चिंचवड महापालिकेवर 364 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज!

आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेवरील कर्जाची घतली माहिती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने आजपर्यंत 559 कोटी 91 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे असा दावा महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी केला आहे .भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेवर असलेल्या कर्जाची माहिती मागविली होती त्यांना लेखी पत्राद्वारे महापालिकेने माहिती दिली आहे.

कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपूल बांधण्यासाठी 159 कोटी 91 लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते .ते कर्ज 30 वर्षासाठी असून त्यापैकी 91 कोटी 90 लाख रुपयांची परतफेड करण्यात आली आहे. मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी चार वर्ष कालावधी साठी मुनिसिपल बोंड द्वारे 200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून 90 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. हरित सेतू आणि टेल्को रस्त्यावर अर्बन स्टीट डिझाईन द्वारे सुशोभीकरण करण्यासाठी हरित कर्ज रोखे द्वारे 200 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे त्याचा कालावधी पाच वर्षाचा असून त्यापैकी 13 कोटी 50 लाख रुपयांची परतफेड करण्यात आली आहे .आतापर्यंत 364 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज फेडणे बाकी आहे .
ते खर्च केंद्र व राज्य शासनाची परवानगी घेऊनच काढण्यात आल्याचे जैन यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. कर्ज व व्याज परत फेडीकरिता महापालिका आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असून क्रिसील व केअर या क्रेडिट रेटिंग संस्थेने महापालिकेस ए ए प्लस स्टेबल क्रेडिट रेटिंग पत मानांकन दिले आहे ,असे जैन यांनी म्हटले आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाकडे लेखी माहिती मागवली होती ती प्रशासनाने तात्काळ लांडगे यांना दिली आहे

