फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ६३४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ६३४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या सात महिन्यांतच तब्बल ६२४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. चालू आर्थिक वर्षात नागरिकांचा वाढता प्रतिसाद, विभागाचे नियोजनबद्ध कामकाज आणि विविध सवलतींचा लाभ या सर्व घटकांमुळे कर संकलनात विक्रमी वाढ झाली आहे. शहरात सध्या एकूण ७ लाख ४० हजार मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी ४ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांनी आतापर्यंत कर भरणा केला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात कर वसुलीचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या काळात ५४२ कोटी ६० लाख रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. त्याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यांत म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ६२४ कोटी ८५ लाख रुपये म्हणजेच तब्बल ८२ कोटी २५ लाख रुपयांचा मालमत्ता कर अधिक वसूल झाला आहे.

पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत नागरिकांनी कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून विभागाने विविध सवलती जाहीर करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यावर भर दिला होता. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक करदात्यांनी ऑनलाईन पर्यायांचा वापर करून घरबसल्या कराचा भरणा केला, तर काहींनी महापालिकेच्या काऊंटरवर थेट कराचा भरणा केला.

ऑनलाईन कर भरण्यास प्राधान्य
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक ऑनलाईन माध्यमातून मालमत्ता कर भरण्यास प्राधान्य देत आहेत. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत ४ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला असून, त्यापैकी ३ लाख ९१ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाईन कर भरला आहे. ऑनलाईन कर भरण्यात आलेली रक्कम ही ४९६ कोटी रुपये आहे.

कर संकलन व कर आकारणी विभागाच्या नियोजनबद्ध कामकाज, डिजिटल सुविधा आणि जनजागृती मोहिमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिकांना घरबसल्या कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे. पुढील काळात ही गती कायम ठेवत करदात्यांना अधिक सुलभ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. — पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"