फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड सांस्कृतिक

गणेशमूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना

गणेशमूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गणेशमूर्तींचे विसर्जन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मार्गदर्श सूचना जारी केल्या आहेत.

निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह येथील नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी शहरातील नागरिकांना आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील आवाहन केले आहे. हा उत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

घरगुती गणपतीचे आणि गौरीचे विसर्जन शक्यतो घरी करण्यावर भर द्यावा किंवा मूर्तीदानास प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन मंडपालगत (कृत्रिम हौदामध्ये) करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश विसर्जनाच्या दिवशी (दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व दहा दिवस ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती व निर्माल्य संकलनाकरीता फुलांनी सजवलेला सुशोभिकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत. तसेच या केंद्रांवर मूर्ती विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी वाहने उपलब्ध असणार आहेत. श्रींच्या विसर्जनाकरीता प्रत्येकी २ कन्वेअर बेल्ट एका विसर्जन ठिकाणांवर उपलब्ध असतील. आवश्यकता भासल्यास अधिकचे कन्वेअर बेल्ट उपलब्ध करून देण्यात येतील. निर्माल्य स्विकारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनात निर्माल्य टाकावे. महानगरपालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येणार आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"