पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकला बदली!

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर पिंपरी चिंचवडचे प्रभारी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची नाशिक येथे बदली करण्यात आली असून पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांच्याकडे पिंपरी चिंचवडचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून शेखर सिंह हे ऑगस्ट 2022 मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये रुजू झाले . त्यांच्या तीन वर्षाच्या कालावधीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले गेले .चिखली कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामे आणि भंगारची दुकाने हटवण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. याशिवाय अनेक विविध विकास कामे करताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तीन वर्ष महापालिका प्रशासक म्हणून त्यांनी मनमानी कारभार केल्याची तक्रार अनेक वेळा करण्यात आली. तीन वर्षानंतर ते आपली बदली पीएमआरडीए मध्ये करण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे . पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांना पिंपरी चिंचवड महापालिकेची माहिती असल्याने त्यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे.

