फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
पिंपरी-चिंचवड

३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!

३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!

पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, नागरिकांना वेळेवर कर भरण्यासाठी प्रोत्साहन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मालमत्ता करावर विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरून या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

viara vcc
viara vcc

शहरातील विकासकामे, सुविधा व सेवांची अखंडित अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी वेळेवर कर भरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन सातत्याने महापालिकेच्या वतीने करण्यात येत असते. तसेच वेळेवर मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी विविध सवलती देखील जाहीर करण्यात येतात. आता महापालिकेने ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना चालू वर्षाच्या सामान्य करावर थेट ४ टक्के सवलत देऊ केली आहे. तरी जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

असा भरा ऑनलाइन कर
•पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
•मुख्य पृष्ठावरील ‘नागरिक’ या पर्यायावर क्लिक करा आणि ‘मालमत्ता कर विभाग’ येथे जा.
•त्यानंतर मालमत्तेला जोडलेला मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाका.
तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर, ‘बिल भरा’ हा पर्याय निवडा आणि आपल्या मालमत्ता कराचे बिल सवलतीसह भरा.

मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य आधार आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून केलेल्या सहकार्यामुळे महापालिकेला रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता अशा महत्त्वाच्या सेवांची अंमलबजावणी करण्यास मदत होते. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना दिली जाणारी ४ टक्के सवलत ही नागरिकांसाठी एक मोठी संधी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ही संधी न गमावता ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन कर भरावा. — प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"