पवना, इंद्रायणी, मुळा- मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्प राबवणार : उदय सामंत

विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांची लक्षवेधी
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने तीन टप्प्यात प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड ,पुणे आणि परिसरातील पवना ,इंद्रायणी ,मुळा -मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण करण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली .
विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पवना,,मुळा व इंद्रायणी या नद्यांचे पुनर्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता .विधान परिषद सदस्य सचिन आहेर यांनीही उपप्रश्न विचारला .याबाबत अधिक माहिती देताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले की इंद्रायणी आणि पवना नदी प्रकल्पाचा पीएमआरडीए मार्फत एकूण खर्च 671 कोटी असून या 60 टक्के केंद्रशासन 40% पीएमपीएमआरडीए निधी वाटप करण्यात करणार आहे .पवना नदी प्रकल्पाचा पीएमआरडीए मार्फत खर्च 218 कोटी असून याबाबतचा निधी 60% केंद्र 40% स्थानिक तर शीइटीपी प्रकल्पाचा खर्च एमआयडीसी मार्फत 1200 ते 1500 कोटी असून एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक सांडपाण्याची शुद्धता तपासणे हा याचा उद्देश आहे .

या संपूर्ण प्रकल्पासाठी जायकाकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्ताव दाखल केला आहे .यावर इंद्रायणी पवना नद्यांचे उगमापासून संगमा पर्यंत संपूर्ण शुद्धीकरण करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथे नुकताच झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले असल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले .