फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

लहान मुलांनी मैदानी व बौद्धिक खेळ खेळण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा!

लहान मुलांनी मैदानी व बौद्धिक खेळ खेळण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा!

पिंपरी चिंचवड पालिका आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा
पिंपरी : जगात सर्वत्र तंत्रज्ञानाचे वारे वाहत आहे. आजकाल प्रत्येक पालकांच्या हातात चोवीस तास मोबाईल दिसत आहे. त्याचेच अनुकरण घरातील लहान मुले मोबाईलचा वापर करतांना दिसत आहेत. त्यामुळे मोबाईल वापरामुळे विचार करण्याची क्षमता खुंटत चालली आहे. मुलांचे आरोग्याकडील लक्ष कमी होत आहे. लहान मुलांनी मैदानी व बौद्धिक खेळ खेळले पाहिजेत त्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला तरच आपल्या पाल्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त यांनी मांडले.

viara vcc
viara vcc

चिंचवड परिसरातील प्रेमलोक पार्क येथील कैं. मनीषा भोईर विरंगुळा केंद्र येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, आप्पा बागल, सुरेश भोईर तसेच महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन भोईर,अविनाश कदम, नंदकुमार साने, विनोद देसाई, पुणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव सुशील गुजर, कोषाध्यक्ष सुदाम दाभाडे, मंदार कुलकर्णी, शशिकांत रहाटे, भूषण पाटील, अनंत भूटे, विष्णू भुते, मुकेश इंगळकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कॅमर खेळावर प्रेम करणारे खेळाडू व नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच शिस्त, संघभावना, कलात्मकता आणि सांघिक समन्वय वाढावा या हेतूने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या स्पर्धेला स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.या स्पर्धेचे स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून संदीप अडागळे आणि सहायक पंच म्हणून गौरव गार्डे, प्रतिक सोमकुवर यांनी काम पहिले.-

अंतिम निकाल : पुरुष एकेरी
1) प्रभाकर भालेराव वि. वि जावेद जावली, 23-08, 25-02, 2) विकी कांगणे वि. वि रुपेश शिंदे, 25-02 ,25-05, 3) दीपक नागतीळक वि. वि सूरज जाधव,19-24, 25-00, 23-06 ,4) शादाब अन्सारी वि. वि सौरभ मेढेकर,21-14, 10-25, 13-12
ज्येष्ठ नागरिक गट
1) संतोष निमकर वि. वि पंकज कुलकर्णी, 14-13, 24-02, 2) रज्जाक शेख वि. वि सुहास पाटील, 15-09, 19-06 ,3) विजय कोठेकर वि. वि सुरेश सोंडकर , 18-12, 16-05, 4) गणेश जंगम वि. वि नितीन गायकवाड, 25-00, 23-00 , 5) संजय मांजरेकर वि. वि डी. स.मोरे, 19-01, 09-12,19-07 ,6) रईस शेख वि. वि यशवंत बोंधरे, 23-04, 25-02

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"