परंडवाल गर्ल्स व स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी विजयी !

“पिंपरी चिंचवड करंडक” १९ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धां
पिंपरी : फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी येथे सुरू असलेल्या “पिंपरी चिंचवड करंडक” १९ वर्षाखालील मुलींच्या २५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धांच्या चौथ्या दिवशी परंडवाल गर्ल्स व स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी विजयी झाले. पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांच्या चौथ्या दिवशी असोसिएशनचे युसुफ बऱ्हाणपुरे यांच्या हस्ते परंडवाल गर्ल्सच्या वैष्णवी म्हाळसकरला सामनावीर पारितोषकदेण्यात आले.
परंदवाल गर्ल्स २६ धावांनी विजयी
१) परंडवाल गर्ल्स विरुद्ध दिवेकर क्रिकेट अकॅडमी यात झालेल्या सामन्यांमध्ये परंदवाल गर्ल्स २६ धावांनी विजयी झाल्या. या सामन्यात वैष्णवी म्हाळसकर सामनावीर ठरली
परंडवाल गर्ल्स २५ षटके १ बाद १८१ धावा:समीक्षा जमदाडे ३४,सुहानी कहांडळ ५६,वैष्णवी म्हाळसकर ५६,स्नेहल ताम्हाणे २१/१.
दिवेकर क्रिकेट अकॅडमी २५ षटके ६ बाद १५५ धावा:-यशस्वी वाघमारे २७,रूहीसिंग २०,अनघा पिसे ३३, सिद्धी लोणकर १२,वैष्णवी म्हाळसकर १२/४,जिविका बोरसे १८/१.
स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी ९ गडी राखून विजयी
२) एसएसए क्रिकेट अकॅडमी विरुद्ध स्कोअर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी यात झालेल्या सामन्यांमध्ये स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी ९ गडी राखून विजयी झाली. या सामन्यात समीक्षा पवार सामनावीर ठरली
एसएसए क्रिकेट अकॅडमी २५ षटके ८ बाद ११२ धावा:-शरयू खंडागळे १२,तन्वी रथकंठीवार ११, निष्का पराशर १०,सानिका शिंदे १३/१,अस्मिता शिंदे २१/३,अर्पिता धायगुडे १९/१.
स्कोअर स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी १६.५ षटके १ बाद ११३ धावा:-समीक्षा पवार ४३, आर्या चिखलीकर ३२, सानिका शिंदे १०.
