राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान विषयक कार्यक्रमांचे आयोजन!

पिंपरी चिंचवड सायन्स व तारांगण येथे २७ फेब्रुवारी ते ०१ मार्च २०२६ दरम्यान आयोजन
पिंपरी : राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त दि. २८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व कल्पकघर (आयसर पुणे व टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड) यांचे संयुक्तपणे दिनांक २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत विविध विज्ञान विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया यांनी दिली.

तपशील खालीलप्रमाणे
दि. २७/०२/२०२६: १) हॅकाथॉन उद्घाटन – स. ९.०० ते १०.००
२) वेदर हॅकाथॉन (मायक्रोवेदर स्टेशन) – स. १०.०० ते सायं. ५.००
३) स्टेम टॉक – हॅकाथॉन मेंटरिंग – स. ११.०० ते दु. १२.००
४) ऑनलाईन चित्रकला स्पर्धा – स. ११.०० ते दु. १२.००
दि. २८/०२/२०२६: १) राष्ट्रीय विज्ञान दिन उद्घाटन – स. ९.३० ते स. १०.००
२) स्टेम मॉडेल व हॅकाथॉन प्रदर्शन (शाळा विद्यार्थी व शिक्षक) – स. १०.०० ते सायं. ५.००
३) “केमिस्ट्री विथ फन” – विज्ञान शो – दु. १२.०० ते दु. १.००
४) “सायन्स बिहाइंड मॅजिक” – जादूगार व्ही. कुलकर्णी – दु. २.०० ते ३.००
५) लिक्विड नायट्रोजन शो – दु. ३.०० ते ४.००
६) स्टेम टॉक – आयसर पुणे प्राध्यापक – दु. ३.३० ते ४.३०
७) समारोप व पारितोषिक वितरण (हॅकाथॉन व मॉडेल प्रदर्शन) – सायं. ५.०० ते ५.३०
दि. ०१/०३/२०२६: १) विज्ञान रंजन स्पर्धा – स. १०.०० ते सायं. ५.००
२) स्टेम मॉडेल प्रदर्शन – स. १०.०० ते सायं. ५.००
३) स्टेम टॉक – आयसर पुणे प्राध्यापक – दु. १२.०० ते १.००
४) समारोप व पारितोषिक वितरण – सायं. ५.०० ते ६.००
५) खुली प्रश्नमंजूषा – विज्ञान क्षेत्रातील महिला (यूट्यूबद्वारे)

