फक्त मुद्द्याचं!

27th February 2026
पिंपरी-चिंचवड

“ऑपरेशन मुस्कान -14″पिंपरी चिंचवड पोलीसांची उत्तम कामगिरी!

“ऑपरेशन मुस्कान -14″पिंपरी चिंचवड पोलीसांची उत्तम कामगिरी!

हरवलेल्या 121 बालकांचा यशस्वीपणे शोध
पिंपरी :18 वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन मुस्कान -14” मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलिसांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या एक महिन्याच्या कालावधीत एकूण 121 बालकांचा यशस्वीपणे शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे

viara vcc
viara vcc

.महाराष्ट्र पोलीस दलामार्फत ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व संबंधित विभागांना विशेष सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी 2018 ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत हरवलेल्या बालकांच्या दाखल प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण 298 बालक हरवलेले असल्याची नोंद होती.

“ऑपरेशन मुस्कान -14” दरम्यान तसेच यापूर्वीच्या तपासातून मिळून एकूण 121 बालकांचा ( 27 बालक व 94 बालिका ) शोध यशस्वीरित्या घेण्यात आला आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांकडे परत देणे हे पोलिसांचे कर्तव्य असून अशा मोहिमांमुळे समाजात सुरक्षिततेचा विश्वास दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. या मोहिमेसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त सारंग आव्हाड व प्रादेशिक उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"