फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पिंपरी-चिंचवड

मतदार यादी मधील नाव शोधणे बाबत ऑनलाईन सर्च सुविधा!

मतदार यादी मधील नाव शोधणे बाबत ऑनलाईन सर्च सुविधा!

पिंपरी : चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत महानगरपालिकेने आपल्या शहरातील नागरिकांना मतदार यादी मधील आपले नाव व मतदान केंद्र शोधणे बाबत मनपा संकेतस्थळावर ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मतदारांना मतदार यादी मधील भाग क्रमांक व अनुक्रमांक या बरोबरच मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता ठळकपणे दिसून येणेकामी लाल रंगात उपलब्ध होणार आहे.

viara vcc
viara vcc

सदर सुविधा वापरणे साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांना मनपाचे संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in यावर उपलब्ध असलेल्या मतदार नाव शोधणे (search voter name) या लिंक वर, सुविधा उपलब्ध असणार आहे

मतदारांचे नाव शोधताना मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये मतदारांचे नाव सर्च करणे शक्य होणार आहे, मतदारांना आपला मतदान ओळखपत्र क्रमांक माहीत असल्यास त्यानुसार देखील शोध घेण्याची सुविधा उपलब्ध आहे

प्रभाग क्रमांक निवडून मतदाराचे प्रथम नाव, मधील नाव व आडनाव यांची नोंद केल्यानंतर संबंधित मतदाराचे मतदान केंद्र व इतर सर्व माहिती सर्च द्वारे उपलब्ध करण्यात आलेली आहे.

महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाइन ला फोन करून ८८८८००६६६६ (8888006666) देखील आपण आपले मतदार ओळख क्रमांक अथवा संपूर्ण नाव सांगून सदर सुविधेचा लाभ घेऊ शकता, संबंधित सारथी कॉल ऑपरेटर आपल्याला माहिती सर्च करून देण्यास मदत करेल.

सदरची सेवा शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्या कामी उपयोगी ठरावी या उद्देशाने सदर सेवेचा शुभारंभ श्रावण हर्डीकर, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हस्ते करण्यात आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"