फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

गुटखा साठवणूक प्रकरणी एकास अटक!

गुटखा साठवणूक प्रकरणी एकास अटक!

पिंपरी : आरोग्यास घातक अशा तंबाखूजन्य 22,114 किंमतीचा गुटखा विक्री करण्याच्या हेतूने साठा करून ठेवला होता. खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी छापा टाकून हा गुटखा जप्त केला. ही कारवाई सोमवार 23 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रूम नंबर एक, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, हरगुडे वस्ती, चिखली येथे करण्यात आली.

किरण अर्जुन जाधव पोलीस हवालदार, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी श्रवणकुमार आत्माराम देवाशी (वय 34, रा.नंबर एक, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, हरगुडे वस्ती, चिखली) आणि महेंद्र देवासी (वरील पत्ता )अशी आरोपींची नावे असून आरोपी क्रमांक एक श्रवणकुमार देवाशी यांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी बेकायदेशीरपणे सरकारने प्रतिबंध केलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी पोत्यामध्ये साठवून ठेवला होता. पोलिसांनी 22,114 किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

 फन अँड जॉय ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा!
पिंपरी : पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे फन अँड जॉय (फन टारगेट) या ऑनलाइन गेम वर जुगार खेळताना कारवाई करण्यात आली. सोमवार 23 डिसेंबर रोजी सव्वा एकच्या सुमारास अंगणवाडी चौक, मोरे वस्ती, गीता खानावळ हॉटेल समोर, चिखली येथे कारवाई करण्यात आली,

के.जी स्वामी पोलीस हवालदार, चिखली पोलीस स्टेशन यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. संदीप प्रकाश गायकवाड (वय 23, रा .मोशी टोलनाका, गायकवाड वस्ती, मोशी ,मुळगाव अशोक नगर निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर )असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संदीप गायकवाड यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये लोकांकडून पैसे घेऊन फन अँड जॉय (फन टार्गेट) ही गेम ऑनलाईन खेळताना रंगेहात पकडण्यात आले. जुगारीचे साहित्य, रोख रक्कम असे एकूण 12510 रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार सुनील काटे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"