पिंपळे निलख येथे गुरुवारी विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी : सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, स्कूल बॅग आणि सन्मानचिन्ह तसेच इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी सचिन कणसे, समाधान बाबर, अरुणा सूर्यवंशी, पै. रोहित माकर, शामराव केदारी, जयवंतराव रानवडे, सुनील बबनराव अडसुळे, राजूभाऊ गुंड, नितीन पाटील, भगवानराव इंगवले, अनुष्का सचिन साठे, राकेश गिरमे आदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
पिंपळे निलख येथील मुख्य बस स्टॉप चौकात, सकाळी १० वाजता, मनपा शाळेसमोर आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. दहावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय सुरज काळुराम नानगुडे स्मृती पुरस्कार रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.