फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रम

जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे येत्या २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सहा या वेळात हे कार्यक्रम होणार आहेत.

विविध नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या, अनेक वारसा स्थळे जपणाऱ्या आपल्या देशात पर्यटन करताना जागरूक आणि जबाबदार पर्यटक कसे व्हावे, याबद्दल या कार्यक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. पर्यटनाची आवड असणारे नागरिक, तसेच शाळांनी हा दिवस साजरा करण्यात उत्स्फूर्ततेने सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील.

कोणते कार्यक्रम होतील?
छायाचित्र प्रदर्शन
– २७, २८ व २९ सप्टेंबर २०२४
विषय – भारतीय वारसा स्थळे
छायाचित्रकार – श्री तुषार कोडोलिकर
वेळ – सकाळी १०.३० ते सायं. ५.३०

तज्ञांची व्याख्याने
२७ सप्टेंबर

वेळ – दुपारी ४ ते ५.३०
विषय – भारतीय वारसा स्थळे, दुर्गभ्रमंती व पर्यटन
वक्ते – श्री अनुराग वैद्य, श्री विनायक बेलोसे

२८ सप्टेंबर
विषय
– नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरील पक्षी : निरीक्षण, पर्यटन आणि संवर्धन
वक्ते – सुशांत पवार

२९ सप्टेंबर
विषय
– विज्ञान भागीरथीचे भगीरथ
वक्ते – विठ्ठल रायगावकर

शालेय विद्यार्थ्यांसाठी खास २७ तारखेला गिरिदुर्ग व स्थापत्य शास्त्र दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व या विषयावरील आंतरशालेय स्पर्धा देखील होणार असून अनेक शाळांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

(अधिक माहितीसाठी संपर्क – ७७४४९४४३३३, कार्यालयीन वेळ – स. १०:०० ते सायं. ०६:००)
….

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"