पवना, मुळा, इंद्रायणी घाटावर जीवरक्षक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी घाटावर २७ ठिकाणी जीव रक्षक नियुक्त केले आहे, अशी माहिती अतिरिक्त अग्निशामन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहर परिसरातीलतीन नद्यांच्या घाटांवर गणेश विसर्जनाची व्यवस्था केली जाते. तेथे आरोग्य, वैद्यकीय पथक तैनात केले आहे. महापालिकेच्या वतीने १७ सप्टेंबरपर्यंत जीव रक्षक तैनात केले आहेत. सकाळी ११ ते रात्री अंतिम विसर्जनापर्यंत हे जीव रक्षक तैनात असणार आहेत. नदी घाटांवर अग्निशमन विभागाच्या वतीने सज्जता करण्यात आली आहे. त्याठिकाणी वाहने तैनात केली आहेत. बोट, लाइफ जॅकेट, रिंग, गळ आदी सुरक्षा साहित्य तैनात केले आहे.
उपायुक्त मनोज लोणकर म्हणाले, ‘गणेशोत्सवाच्या वतीने आवश्यक ती व्यवस्था केली आहे. नदी घाटांवर आरोग्य, वैद्यकीय, सुरक्षा विभाग अशी सज्जता केली आहे. अपघात होऊ नये, यासाठी अग्निशामक विभागाच्या वतीने पथक, वाहने आणि यंत्रसामुग्री तैनात केली आहेत.’