बालदिनानिमित्त सायन्स पार्कमध्ये आज कार्यक्रम

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : बालदिनानिमित्त उद्या १४ नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथील कल्पकघरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालभवन, पुणे येथील डॉ. विदुला म्हेसकर यावेळी मार्गदर्शन करतील. लहान मुलांसाठी कमी किमतीत खेळणी कशी तयार करायची, याबाबत त्या मार्गदर्शन करणार आहेत. उद्या (गुरुवारी) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/uzDXcNZbou6z8ARV9 या लिंकवर नोंदणी करावी. पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, आयसर पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकीबाबतचे सखोल ज्ञान मिळावे आणि शिकविण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी संशोधक पद्धतींचा वापर करावा, या उद्देशाने हा उपक्रम घेतला जात आहे.