तुकोबारायांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचावेत

गणेश महाराज फरताळे यांचे प्रतिपादन; संभाजी ब्रिगेडच्या वतीने तुकोबांची जयंती साजरी
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : संत तुकोबारायांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत गणेश महाराज फरताळे यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जयंती भक्ती- शक्तीसमूह शिल्प निगडी येथे उत्साहात साजरी केली. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष मंचक जाधव, डॉ मोहन पवार, संतोष बादाडे, शशिकांत भोसले, वाल्मिक माने यांच्या हस्ते अर्पण केले.
शिवकीर्तनकार गणेश महाराज फरताळे म्हणाले, ‘संत तुकाराम महाराज हे निर्भीड संत व विद्रोही कवी होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी विचार हे
खेडोपाड्यात पोहाचले पाहिजेत. त्यांनी दाखवलेला मानवतावादी विज्ञानवादी दृष्टिकोन जनमाणसात पोहचायला हवा आणि यातून संत तुकाराम महाराज यांचे महान कार्य जनतेसमोर घेऊन गेले पाहिजे, संत तुकोबारांयाची शिकवण ही समतेवर आणि मानवतेच्या प्रेमावर आधारित आहे. तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली पाहिजे. तुकाराम महाराज यांनी जगाला गाथेतून दिला खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा खरा संत असतो आणि तेच काम संत तुकाराम महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी केलं आणि अशा महान क्रांतिकारी संताच्या जयंतीचा विसर आज पडलेला दिसून येत आहे.
यावेळी निरंजनसिंह सोखी, अनिल सावंत, शाहूराज कदेरे, पोपट काळे, भागिंदरे महाराज, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष वसंत पाटील, गणेश पवार, छावा संघटनेचे बिट्टू पाटील, प्रफुल्ल पुराणिक, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अजय भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष लहूजी लांडगे, शहर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, संघटक गणेश जवळकर, मर्दान घावटे, सुरेश भिसे, महेश कांबळे, उत्तम मोरवेकर, मोहीत साळुंखे उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी केले होते सूत्रसंचालन विशाल मिठे यांनी संयोजन केले. गणेश दहिभाते यांनी आभार मानले.