बालकांच्या कलात्मक विकासासाठी रंगभूमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, बालकांचा कलात्मक विकास व्हावा, यासाठी बालरंगभूमी परिषद कार्यरत आहे, लोककलेचा जल्लोष कार्यक्रमातून संपूर्ण राज्यात कार्यक्रम झाले. पण, विशेष मुलांच्या दिव्यांग महोत्सवात मुलांचा सहभाग, शिक्षकांचा गौरव केला. ही बालरंगभूमी परिषदेच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे, असे मत प्रसिध्द अभिनेत्री, बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलिम शिर्के सामंत यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीने विशेष मुलांचा ‘यहा के हम सिकंदर’ हा महामहोत्सव नुकताच झाला. त्यास रसिकांनी दाद दिली. महोत्सवाचे उद्घाटन नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून केले. यावेळी उत्पादन शुल्कचे माजी आयुक्त कांतीलाल उमाप, बालरंगभूमी परिषद पुणेच्या अध्यक्ष दिपाली शेळके, रमेश गडदे, धीरज बिरदवडे, राजू तुलालवार, सतीश लोटके, धनंजय जोशी, अनंत जोशी, देवेंद्र भिडे, नारायण करपे, अरूण पटवर्धन, स्मिता मोघे, राजू बंग, पंकज चव्हाण, रूपाली पाथरे, विनायक कुलकर्णी उपस्थित होते.
३३ शिक्षकांचा सन्मान
विशेष मुलांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या ३३ शिक्षकांचा सन्मान केला. त्यात वनिता धुमाळ, मंगल खुंटे, रेश्मा तांबोळी, प्रशांत खेमनर, सोनाली शिनगारे, शुभांगी सुपेकर, शशिकांत खरात, बाळासाहेब वाळुंज, हनुमंत पांचाळ, दिनेश राजे, धोंडीराम भोईटे, मालन तिडक, मंजिरी कुलकर्णी, गणेश पाटील, कमलाकर ढवळे, वर्षा काळे, हेमंत यादव, रावसाहेब थोरात, राजश्री तापकीर, संतोष पोफळे, वंदना सावंत, प्रकाश वैरागर, उज्वला सोनी, ज्योती पाटील या शिक्षकांचा सन्मान करण्यात आलं. १८ वर्षावरील कार्यशाळेमध्ये असणाऱ्या मुलांच्या तयार केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन झाले. मनोज डाळिंबकर यांनी सूत्रसंचालन केले. दिपाली शेळके यांनी प्रास्ताविक केले. नारायण करपे यांनी आभार मानले.