गणेशोत्सव काळात सामजिक भान हवे: जितेंद्र कोळी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
चिंचवड, प्रतिनिधी : आगामी गणेश उत्सव काळात सामाजिक भान ठेवून उत्सव साजरे करा, असे आवाहन चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी केले. चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत मंडळाच्या अडचणी जाणून घेऊन सहाय्यक सहाय्यक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांनी सहभागी कार्यकर्त्यंना सूचना दिल्या. चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक श्रीमती वर्षा राणी पाटील उपस्थित होत्या. या प्रसंगी मार्गदर्शन करताना कोळी म्हणाले, गणेशोत्सवाच्या मंडपाच्या आकाराचे नियोजन करा. वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची काळजी मंडळांनी घेतली पाहिजे.
मंडपामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करावी. मंडपामध्ये जनरेटरची सोय तसेच बॅटरी गॅसबती उपलब्ध ठेवावी, वादग्रस्त देखावे कार्यक्रम करणे टाळावे.कार्यक्रमाची रूपरेषा पोलीस स्टेशनला जमा करावी. ध्वनीक्षेपकाचे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे. मंडपामध्ये अथवा इतरत्र अनोळखी संशयित बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ कळवावे,खिसे कापू पासून सावध रहा, अफवा पसरू नका, स्त्रियांनी आपले दागिने सांभाळावेत, मुलांना एकटे सोडू नका, आपले वाहन योग्य ठिकाणी पार्क करा, वाहनात मौल्यवान वस्तू ठेवू नका, याबाबत सूचना फलक लावावे. मंडपामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी मंडळाचे स्वयंसेवक नेमावे.मंडळांनी गणेशोत्सव काळात स्वतः महावितरण कडून तात्पुरते मीटर घ्यावेत.
या वेळी मंडळाचे २०० पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश मंडळाच्या सभासदानी आपल्या अडचणी सांगीतल्या. याची दखल घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले. या प्रसंगी शांतता कमिटी सदस्य व संस्कार प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते.शांतता व कायदा सुव्यवस्था ठेऊन गणेशोत्सव साजरा करू असे आश्वासन मंडळाच्या पदाधिकार्यांनी दिले.
मंडळांनी घ्यावी ही काळजी
- महिलांची व पुरुषांची दर्शन रांग वेगळी ठेवावी.
- सर्व गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
- गणपतीच्या मूर्ती जवळ २४ तास स्वयंसेवक नेमावेत.
- पत्ते खेळणे दारू पिणे यासारखे प्रकार करू नये.
- गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन केल्यानंतर हार व इतर निर्माल्य नदीत फेकू नये.
- भाविकांनी दिलेली वर्गणीसाठी सक्ती करू नये.
- गणेश मंडळांच्या देखाव्याची माहिती पोलिस ठाण्यांना द्यावी.
- गरजू विद्यार्थी यांना शैक्षणिक मदत करावी.