फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

असीम सरोदे यांच्याशी उद्या संवाद

असीम सरोदे यांच्याशी उद्या संवाद

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (२ ऑक्टोबर) ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता निगडी-प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.

सरोदे यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार नितीन ब्रह्मे हे संवाद साधणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राजकीय पक्षांची तोडफोड, निवडणूक चिन्हांचे दावे-प्रतिदावे, आमदारांची अपात्रता, न्यायालयीन तसेच विधिमंडळातील निवाडे ते थेट बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा पोलिसांनी नुकताच केलेला एन्काऊंटर ! या सगळ्या प्रकरणांमध्ये संविधानाची पायमल्ली केली जात असल्याची टीका सातत्याने होत आहे. संविधानिक नैतिकता पायदळी तुडवण्यात येत असल्याच्या विविध घटनांचे अन्वयार्थ लावत, परखड विश्लेषण करणारे ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्याशी थेट संवादाचा हा कार्यक्रम आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"